1.0k views
आषाढी एकादशी पासून चातुर्मास प्रारंभ होतो.
in Hindu - Traditions by (11.3k points)

1 Answer

0 votes
 
Best answer
आषाढी एकादशी पासून चातुर्मास प्रारंभ होतो. या चार मासात व्रतवैकल्ये करण्याचा प्रघात आहे. तसेच काही गोष्टी वर्ज्य कराव्यात व अनेक देवतांची उपासना आपल्या हातून व्हावी हा उद्देश आहे.
पृथ्वीवरील व्रज -तम, वाढल्याने या कालामधील सात्वीकता वाढवण्यासाठी चातुर्मासात व्रतस्थ रहावे असे शास्त्र सांगते.
तिथी
१ - आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून ( गुरु पौर्णिमा ) कार्तिक पौर्णिमापर्यंत ( त्रिपुरी पौर्णिमा ) या चार मासांच्या काळास चातुर्मास म्हणतात.
२- काळ आणि देवता - मनुष्याचे एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते. दक्षिणायण ही देवांची रात्र असून उत्तरायण ही त्यांचा दिवस असतो. कर्क संक्रांतीस उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायणास प्रारंभ होतो. म्हणजेच देवांची रात्र प्रारंभ होते. कर्कसंक्रांत आषाढ मासात येते. म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस शयनी एकादशी म्हणतात. कारण त्या दिवशी देव झोपी जातात. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन उठतात. म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. वस्तुतः दक्षिणायण सहा मासांचे असल्यामुळे रात्र ही तेवढीच असायला हवी, पण बोधिनी एकादशीपर्यंत चारच मास पूर्ण होतात. याचा अर्थ असा की एक त्रितीयांश रात्र शिल्लक आहे, तोच देव जागे होतात आणि आपले व्यवहार करू लागतात. नवसृष्टी निर्मिती हे ब्रह्म देवाचे कार्य चालू असताना पालनकर्ता विष्णु निशिक्रिय असतो. म्हणून चातुर्मासास विष्णु शयन म्हटले जाते. तेव्हा श्रीविष्णु क्षीरसागरात क्षयन करतो, असे समजातात. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णु शयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो.
३ - महत्त्व - देवांच्या या निद्राकालात असून प्रबळ होतात. आणि मानवाला त्रास देऊ लागतात. म्हणून असूरांपासून स्वतःचे सरंक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे असे धर्मशास्त्र सांगते.
अर्थ - प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणतेतरी व्रत अवश्य करावे, अन्यथा त्याला संवत्सर्ध्व असे पातक लागते.
४ - वैशिष्ठ्ये - अ ) या कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप पालटलेले असते. आ ) पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मासचे व्रत एकास्थानी राहूनच करावे, असा प्रघात पडला. इ ) मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशावेळी त्यास अनुसरुन कंद, वांगी, चिंचा, इ. खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितलेले आहे. ई ) परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रंपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय. उ ) चातुर्मासातील श्रावण मास विशेष महत्त्वाचा आहे. भाद्रपद मासातील वद्य पक्षात महालय श्राद्ध करतात. ऊ ) चातुर्मासात सण आणि व्रते अधिक असण्याचे कारण “ श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या चार मासात ( चातुर्मासात ) पृथ्वीवर येणार्‍या लहरिंत तमोगुण अधिक असलेल्या यम लहरिंचे प्रमाण अधिक असते. त्यांना तोंड देता यावें; म्हणून सात्विकता वाढवणे आवश्यक असते. सण आणि व्रते यांद्वारे सात्विकता वाढत असल्याने चातुर्मासात जास्तीत जास्त सण आणि व्रते आहेत. संशोधनाद्वारे असे आढळून आले आहे की, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये स्त्रियांना गर्भाशयासंबंधी रोग चालू होतात किंवा वाढतात, असे आढळलेले आहे.
५ - व्रते - सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात. पर्णभोजन ( पानावर जेवण करणे, एक भोजन ( एक वेळेस जेवणे, अयाचित ( न मागता मिळेल तेवढे जेवणे ), एकवाढी ( एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे ), मिश्र भोजन ( सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे ) इत्यादी भोजन नियम करता येतात. कित्येक स्त्रिया चातुर्मासात ‘ धर्मे - पारणे ’ नावाचे व्रत करतात. यात एक दिवस भोजन आणि दुसर्‍या दिवशी उपवास असे सतत चार मास करायचे असते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यांवर राहतात. काही एकभुक्त राहतात. देशपरत्वे चातुर्मासातसे विविध आचार असतात.
६ - वर्जावर्ज्य  
अ ) वर्ज - प्राण्यांच्या अस्थिंचा चुना, चर्म पात्रातले उदक, ईडलिंबू, महाळूंग, वैष्वदेव न झालेले आणि विष्णुला अर्पण न केलेले अन्न, मसूर, मांस, पांढरे पावटे, घेवडा, चवळी, लोंची, वांगी, कलिंगड, बहुबिज, किंवा निर्बिज फळ, मूळा, कोहळा, बोरे, आवळे, चिंच, कांदा आणि लसूण हे पदार्थ. मंचकावर चयन. ऋतू कालावाचून स्त्रीरमण. परान्न. विवाह किंवा अन्य तस्सम कार्य चातुर्मासात यतीला वपन वर्ज्य सांगितले आहे. त्याने चार मास, निदान दोन मास तरी एकाच ठिकाणी रहावे, असे धर्मसिंदूत आणि इतरही काही धर्मग्रंथात सांगितले आहे.
आ ) अवर्ज्य - चातुर्मासात हविष्यान्न सेवन करावे, असे सांगितले आहे. तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, समुद्रातले मीठ, गाईचे दूध, दही, तूप, फणस, आंबा, नारळ, केळी, इत्यादी पदार्थही हविष्ये जाणावीत. ( वर्ज्य पदार्थ रज - तमगुणयुक्त असतात. तर हविष्यांने सत्व गुणप्रधान असतात.
७ - तप्तमुद्रा - वैष्णवांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशीस तप्तमुद्रा धारण कराव्या, असे रामार्चण चंद्रिकेत सांगितले आहेत. ( काही उपसंप्रदायांचे स्वामी मुद्रा उण करून त्याचा छाप दुसर्‍यांच्या शरीरावर मारतात, त्याला तप्तमुद्रा असे म्हणतात. ) तप्तमुद्रांविषयी प्रशंसापर विधीवाक्य आणि निंदापर निषेध वाक्यें पुष्कळ आढतात. तेव्हा त्या विषयी शिष्ठाचाराप्रमाणे व्यवस्था जाणावी, असे धर्मसिंधूकार म्हणतात.
by (11.3k points)
selected by
...