7.9k views
in Hindu - Beliefs by (11.3k points)

1 Answer

+1 vote
प्रत्येक हिन्दूंचे घरात देव्हारा असतो आणि तो वडिल मुलाच्या घरातच असावा असा संकेत आहे. देव्हार्‍यात कुलदेवतेची उपासना, पूजाअर्चा करणे आवश्यक आहे. जर आपल्याला कुलदैवत माहित नसेल तर आधीच्या सर्व पिढ्यांचा तपास लावून कुलदैवत शोधावे, जरूर पडल्यास वंशावळीचा आधार घ्यावा. कुलदैवताच्या मूर्ती किंवा टाक करण्याची पध्द्त आहे. शक्यतोवर मुलाच्या लग्नात देवकार्याला नवीन टाक करतात. देव्हार्‍यात कधीही पूर्वजांचे टाक अथवा मूर्तीची पूजा करू नये. कांही घराण्यात पाहुणे दैवत असते. आपल्या पूर्वजांपैकी कोणीतरी कांहीतरी नवस बोलला असल्यास असा प्रकार होतो. असा प्रश्न पडतो त्याचे काय करायचे पण एखाद्या ब्राह्मणाच्या हातून त्याचे विसर्जन करता येते. उदा. एखाद्या देव्हार्‍यात उजव्या सोंडेचा गणपती असतो, त्याची पूजाअर्चा जमत नाही अशा वेळेस त्या मूर्तीची पूजा, अभिषेक करून गणपतीच्या देवळात नेऊन ठेवता येते. शक्यतो देव्हार्‍यात देवांची गर्दी करू नये, कारण सध्यांचा काळ धावपळीचा असल्याने नवीन पिढीला पूजा जमेलच असे नाही, शेवटी भाव तेथे देव.
by (11.3k points)
...