703 views
in Hindu - Beliefs by (11.3k points)

1 Answer

0 votes
 
Best answer
नमस्कार करणे म्हणजे आदरभाव व्यक्त करणे, विनयशीलता हाही त्यातील एक भाग होय.
१ ) नमस्कार कोणास करावा ? देवाची मूर्ती, आचार्य, साधु - सत्पुरुष, गुरु, मातापिता व इतर वंदनीय व्यक्ती यांना साष्टांग नमस्कार करावा. तसे करणे शक्य नसेल तर गुडघे टेकून चरणांवर मस्तक ठेवावे. वंद्य व्यक्तींना पादांगुष्ठास स्पर्श करून त्याच हाताने आपल्या नेत्रांस स्पर्श करावा.
२ ) जे आपल्या बरोबरीचे असतील व जे चरणस्पर्श करू देणार नाहीत अशा व्यक्तींना अंजलिसंपुट करून मान खाली वाकवून नमस्कार करावा.
३ ) आपले शरीर अशुची, अस्नात असेल अशा स्थितीत गुरुजनांना नमस्कार करण्याची वेळ आल्यास त्यांच्यासमोर मस्तक जमिनीला टेकवावे.

आधार - ब्रह्मवैवर्त पुराण, दासबोध, मनुस्मृती, हि. ध.
by (11.3k points)
selected by
...