923 views
in Hindu - Beliefs by

1 Answer

0 votes
 
Best answer
घरात कुठलेही मंगल कार्य होणार असेल तर त्याआधी आपण मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस शुभ-लाभ लिहीतो.

प्रत्येक मंगल प्रसंगी स्वस्तिकसोबत आपण शुभ-लाभ लिहीतो. शेंदूर आणि कुंकवाने शुभ-लाभ लिहील्याने गणपती व महालक्ष्मीबरोबरच सर्व देवता प्रसन्न होतात असे मानले जाते.
पुराण आणि शास्त्राज्ञानुसार गणपतीला दोन मुले आहेत. पहिला क्षेम म्हणजेच शुभ तर दुसरा लाभ. घरात सुख-समृद्धी टिकून राहण्यासाठी घराच्या बाहेर शुभ-लाभ लिहीतात.
शुभ लिहिण्याचा अर्थ असा आहे की, ज्या कला, साधन, आणि ज्ञानाच्या मदतीने घरात पैसा व यश येते ते सदैव टिकून राहावे.
लाभ लिहीण्यामागचा भाव असा आहे, की आपण देवाला प्रार्थना करतो की घरात येणारा पैसा नेहमी वाढत राहावा. गणपतीच्या कृपेने व्यवसाय व समृद्धी वाढत राहू दे.
by
selected by
...