488 views
समुद्रस्नान कोणत्या वेळी करणे योग्य व कोणत्या वेळी करणे आयोग्य ?
in Hindu - Beliefs by (11.3k points)

1 Answer

0 votes
 
Best answer
आश्वलायन यांच्या मते पर्वणी, अमावस्या - पर्वणी व अमावस्येस समुद्रस्नान करावे. म्हणजे मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो. पर्वणीच्या वेळी समुद्रस्नान करून तर्पण केले असता समुद्र मानवाला पवित्र करतो. मात्र शुक्रवार, मंगळवार या दिवशी  व पर्वणीकालावाचून कोणत्याही दिवशी समुद्रस्नान करू नये. मात्र पृथ्वीचंद्रोदयात प्रभासखंडात असे सांगितले आहे की, मंत्रावाचून, पर्वणीवाचून क्षुरकर्मावाचून कुशाग्रानेही समुद्राला स्पर्श करू नये. यास अपवाद नदी समुद्रास मिळते ते ठिकाण, सेतुबंध, अन्य तीर्थाच्या ठिकाणी असलेला समुद्र पवित्र आहे. तेथे केव्हाही स्नान करण्यास प्रत्यवाय नाही.

आधार - निर्णय सिंधु
by (11.3k points)
selected by
...