712 views
in Hindu - Puja Vidhi by

1 Answer

0 votes
 
Best answer
होय, असे व्रत आहे-- कार्तिक कृष्ण चतुर्थीला एक व्रत सांगितलें आहे, त्या व्रतास ‘कर्काचतुर्थी’ व्रत म्हणतात.आणि हे व्रत फक्त स्त्रियांसाठीच सांगितलेआहे. या दिवशीं स्त्रियांनी स्नान करून चांगली वस्त्र नेसून गणपतीची मनोभावे पूजा करावी. नंतर वेगवेगळ्या पक्वान्नांनी भरलेलीं दहा ताटे भक्तिपूर्वक गणेशाला अर्पण करावी. गणेशाची प्रार्थना करावी. नंतर सुवासिनींनी स्त्रियांना आणि ब्राह्मणांना तीं दहा ताटें वाटून टाकावींत. नंतर रात्रीं चंद्रोदय झाल्यावर त्याला विधिपूर्वक अर्ध्य द्यावेत आणि रात्री भोजन करून व्रत पूर्ण करावे. ( संदर्भ--नारदपुराण-चतुर्थपाद-अध्याय १४३ वा )
by
selected by
...