607 views
in Hindu - Puja Vidhi by
edited

1 Answer

0 votes
 
Best answer

श्रीयंत्रात ‘शिवयुवती’ आणि ‘श्रीकंठ’ या त्रिकोणांच्या भोवती ४३ त्रिकोण रेखाटलेले आहेत. या त्रिकोणाच्या भोवती एक वर्तुळ असून त्याच्या बाहेर आठ पाकळ्यांचे कमळदल आहे. पुन्हा त्याच्याबाहेर सोळा पाकळ्यांचे कमळदल आहे, पुन्हा त्याच्याबाहेर भुपूर आहे. आणि त्यावरील वर्तुळात व बाहेर मुद्राशक्ती, लोकपाल, मातृका, सिद्धी इत्यादींची स्थाने आहेत. या यंत्रात जी नऊ चक्रे रेखाटलेली आहेत त्यांची नावे खालीलप्रमाणे--

 1. बिन्दु-- शक्तित्रिकोणातील हा बिंदु म्हणजे महात्रिपुरसुंदरी किंवा ललितादेवीचे निवासस्थान होय ! मणिद्वीप हे सुधासागरात आहे, असे तांत्रिक मानतात. तेव्हा बिन्दु हा द्वीपाचा निर्देशक होय ! असे काही जाणकार मानतात.
 2. त्रिकोण-- हे चक्र त्रिकोणाचे बनलेले आहे. त्रिकोणाच्या तीन कोनांवर कामरूप येथील कामेश्वरी, पूर्णगिरी येथील वजेश्वरी ( या पीठाच्या देवतेचे नाव ‘कालिका’ असे आहे. ) व जालंधर येथील ‘भग-मालिनी’ ( या पीठाची देवता वजेश्वरी आहे. ) या देवता अधिष्ठित असून मध्यभागी उडियान येथील ‘कात्यायनी’ देवता आहे.
 3. त्रिकोणसमूह-- या चक्रात आठ त्रिकोण आहेत. या त्रिकोणांच्या बिन्दूंवर वशिनी, कामेश्वरी, मोहिनी, विमला, अरुणा, जयिनी, सर्वेश्वरी व कौलिनी या देवता असून त्या मानवी शरीरातील शीत, उष्ण, सुख, दु:ख, इच्छा, सत्य, रज व तम या गुणांचे प्रतीक होत.
 4. दहा त्रिकोणसमूह-- या चक्रात दहा त्रिकोण आहेत. त्यातील देवता अशा--सर्वज्ञा, सर्वशक्तिप्रदा, सर्वेश्वर्यप्रदा, सर्वज्ञानमयी, सर्वव्याधिनाशिनी, सर्वधारा, सर्वपापहरा, सर्वानन्दमयी, सर्वरक्षा व सर्व इच्छाफलप्रदा या होत. या देवता मानवी शरीरातील रेचक, पाचक, शोषक, दाहक, प्लावक, क्षारक, उद्धारक, क्षोभक, जृम्भक व मोहक या गुणांच्या प्रतीमूर्ती होत.
 5. दहा त्रिकोणसमूह-- या चक्रात दहा त्रिकोण आहेत. त्यातील देवता अशा--सर्वसिद्धिप्रदा, सर्वसंपत्प्रदा, सर्वप्रियंकरी, सर्वमंगलकारी, सर्वकामप्रदा, सर्वदु:खविमोचिनी, सर्वमृत्यूप्रकाशमयी, सर्वविघ्ननिवारिणी, सर्वांगसुंदरी व सर्वसौभाग्यदायिनी या होत.
 6. चौदा त्रिकोणसमूह-- या चक्रात चौदा त्रिकोण असून त्यातील देवता मानवी शरीरातील रक्तवाहिन्यांच्या निदर्शक आहेत. या देवता अशा-- सर्वसंक्षोभिणी, सर्वविद्राविणी, सर्वाकर्षिणी, सर्वाह्रदिनी, सर्वसंमोहिनी, सर्वस्तंभिनी, सर्ववशंकरी, सर्वरंजिनी, सर्वोन्मादिनी, सर्वर्थसाधिनी, सर्वसंपत्तिपूरणी, सर्वमंत्रमयी व सर्वद्वदक्षयंकरी. या देवता मानवी शरीरातील रक्तवाहिन्या, अलंबुरवा, कुहु विश्वोदरी, वारणा, हस्तिजिव्हा, यशोवती, पयास्विनी, गंधारी, पूषा, शंरिवणी, सरस्वती, इडा, पिंगला व सुषम्ना यांच्या प्रतीक होत.
 7. आठ पाकळ्यांचे कमळ-- या चक्रात अष्टपद्मदल असून त्यात अनंगकुसुमा, अनंगमालिनी या देवता आहेत. या सर्व देवता मानवी शरीरातील वचन, आदान, गमन, विसर्ग, आनंद, उपादान, दान, उपेक्षा या गुणांच्या निदर्शक होत.
 8. सोळा पाकळ्यांचे कमळ-- या चक्रात सोळा दळांचे कमळ आहे. यातील देवता अशा--कामाकर्षिणी, बुध्याकर्षिणी, अहंकारकर्षिणी, शब्दाकर्षिणी, रूपाकर्षिणी, रसाकर्षिणी, गन्धाकर्षिणी, चित्ताकर्षिणी, धैर्याकर्षिणी व शरीराकर्षिणी. या देवता मानवी शरीरातील मन, बुद्धी, अहंकार इत्यादी गुणांच्या निदर्शक होत.
 9. भुपूर व त्यामधील इतर देवता-- या चक्राला ‘भूपूरचक्र’ असे नामाभिधान असून याचे चार भाग आहेत. ते असे--
  • षोडशदल कमळाच्या बाहेरील तडाग-सद्दश चार वर्तुळे.
  • षोडशदलाला लागून असलेली बाहेरची पहिली रेरवा.
  • षोडशदलाला लागून असलेली बाहेरची दुसरी रेरवा.
  • वरील रेरवांच्या बाहेरचा भाग.

या चार भागात क्रमश--१० मुद्राशक्ति, १० दिक्‌पाल, ८ मातृका आणि १० सिद्धी अधिष्ठित आहेत. या देवतास्वरूप यंत्राची स्थापना अनेक शक्तिपीठातून केलेली आढळते. उदाहरणार्थ, विंध्यवासिनी पीठामध्ये भैरव कुंडाजवळ, तिरवा (जिल्हा फरूकाबाद) येथे अन्नपूर्णा मंदिराच्या परिसरात, काशी विश्वेश्वराच्या मंदिरात, कोल्हापूर येथील महालक्ष्मीच्या मंदिरात, तुळजापूरला भवानी मंदिरात, कांजीवरमला कामाक्षीच्या मंदिरात श्रीयंत्राची स्थापना केलेली आढळते.

by
selected
...