626 views
in Hindu - Beliefs by (11.3k points)

1 Answer

0 votes
 
Best answer
तेरा या आकड्याला परदेशात विशेषत: ख्रिश्चन लोकांनी वर्ज्य ठरविले आहे. गणिताच्या भाषेत नव्हे तर धर्मकृत्य, सामाजिक व्यवहार यामध्ये जिथे १३ चा संबंध येईल तेथे तो टाळतात. कारण हा अंक थेट येशूच्या - जीझसच्या चरित्राशी निगडित असून दुर्भाग्यकारक आहे. त्याचा पूर्वेतिहास हेच दाखवितो. त्यामुळे तेरा अंक हा अशुभ मानला जातो.
जुडास हा रात्रीच्या जेवणाला ( Last Supper ) आमंत्रित केलेला १३ वा अतिथी होता. त्यानेच पुढे जीझसचा विश्वासघात केला. त्यामुळे तेरा अंक हा विश्वासघातकी ठरून वर्ज्य करण्यात आला. पवित्र बायबलचा आधार असल्याने ही समजूत लोकमानसात दृढ झाली. १३ अंक हा अशुभच मानून नित्याच्या व्यवहारातही लोक हा अंक वर्ज्य करू लागले. जीझसच्या मृत्यूला कारण झालेला १३ वा अतिथी जुडास याच्याविषयी आणि तेरा अंकाविषयी ख्रिश्चनांना जो तीव्र संताप आला तो स्वाभाविकच होता. पुढे जुडासने गळफ़ास घेऊन आत्महत्या केली, पण तेरा अंक नाश करणाराचे प्रतीक म्हणून लोकव्यवहारातून हद्दपार झाला. हे आजही पाळले जाते. त्याचे परिणाम असे -
तेरा माणसे टेबलावर एकत्र जेवायला बसणे अशुभ ठरले.
काही अंधश्रद्ध माणसे १३ लोक असलेली पार्टी टाळतात.
अनेक बहुमजी इमारतींमध्ये १३ क्रमांक मजल्याला देत नाहीत. ( १२ नंतर १४ )
काही हॉटेल्समध्ये १३ नंबरची खोलीच नसते. तसेच कित्येक रस्त्यावरील घरांमध्ये १३ नंबरचे घर असत नाही. कित्येक गावात १३ नंबर दिलेला रस्ताही नसतो. हॉस्पिटलमध्ये १३ वी खोली नसते.
काही प्रमुख विमानतळांवर १३ क्र. चे दार नसते आणि विमानात १३ क्र. आसन नसते.
एक गंमत अशी की इटलीमधील एका गावातील रस्त्यावर ( Florence ) १२ आणि १४ नंबरच्या मध्ये असलेल्या एका घराला ‘ साडेबारा ’ नंबर दिला आहे.
असाच एक गमतीचा प्रकार फ़्रान्समध्ये आहे. तिथल्या एका संस्थेने आपले सदस्य कोणाकडे तेरा जणांची पार्टी असेल तर तेथे पाहुणा म्हणून १४ वा अतिथी बनून जातील अशी जाहिरात केली आहे. ते Quatorziens ( Fourateeners )
इटलीच्या नॅशनल लॉटरीत १३ अंक गाळला जातो.
आणखी एक मौजेची गोष्ट म्हणजे तुमच्या नावात १३ अक्षरे असतील तर तुमचे दुर्भाग्य. हा हास्यास्पद प्रकार केवळ मनोरंजनासाठी एकमेकांना सांगितला जातो.
प्रभू येशूला क्रूसावर ठोकून देहदंड देण्यात आला तो शुक्रवार होता आणि तारीख १३ होती. त्यामुळे १३ अंक आणि शुक्रवार हा दिवस ख्रिश्चन लोक दु:खाचा मानणार हे साहजिक आहे. तेव्हापासून १३ शुक्रवार हा दिवस लक्षणीय ठरला आहे. पण त्याला दुसरीही एक पावित्र्याची बाजू आहे. त्याला त्यामुळेच Good Friday असे म्हटले गेले आहे.
शुक्रवारी घडलेल्या अनेक वाईट घटनांची नोंद तिकडाच्या Theologian धर्मज्ञांनी मान्य केली आहे.
शुक्रवारी अऍडम आणि ईव्ह यांना ‘ गार्डन ऑफ़ ईडन ’ मधून हाकलून दिले.
नोहाचा ( Noah's ) पूर येण्यास शुक्रवारीच आरंभ झाला.
ख्रिस्ताला ( Christ ) शुक्रवारीच क्रूसावर ठोकले.
अशा हकीगतींना बळकटी देणार्‍या शुक्रवारच्या घटना पुष्कळ आहेत. तशाच ‘ Good Friday '( गुड फ़्रायडे ) संबंधात चांगल्या गोष्टीही आहेत -
या दिवशी जन्मलेले मूल भाग्यवान असते.
या दिवशी केस कापले तर पुढील वर्षात डोकेदुखीचा त्रास थांबतो.
या दिवशी मृत्यू येणारास सरळ स्वर्गात प्रवेश मिळतो.
by (11.3k points)
selected by

Related questions

...