1.3k views
आपल्या जीवनात आपण अनेक प्रकारचे दान करतो आणि त्याचे पुण्य अथवा फळ मिळतेच.

देवाच्या दारी सर्व गोष्टींचा ताळेबंद असतो. जर आपण कोणती खाण्याची चस्तू त्याग केली असता ते सुद्धां एक दानच होय.
in Hindu - Beliefs by (11.3k points)

1 Answer

0 votes
ह्या विषयाचा संदर्भ स्कंद पुराणात मिळतो.

पुराणानुसार अधिक महिन्यात आवडत्या वस्तूचा अथवा एकादा पदार्थ अथवा वस्तू वर्ज्य करावी.

शय्येचा अथवा खोटे बोलण्याचा किंवा लबाडीने वागण्याचा त्याग केल्याने महान सुखाची प्राप्ती होते.

मिरचीचा त्याग केल्याने मनुष्यास राजपद प्राप्त होते.

न्हाव्याकडून हजामत न करून घेतल्यास विविध त्रासापासून मुक्ती मिळते.

केशराचा त्याग केल्यास राजाश्रय अथवा राजाची मर्जी प्राप्त होते.

उडीद किंवा उडीद डाळ आणि हरबरा डाळ, चणे त्यागले असता पुनर्जन्मापासून मुक्ती मिळते.

रेशमी वस्त्र न वापरल्यास अक्षय सुखाची प्राप्ती होते.

श्रावणात कांदा लसूण खाऊ नये.

त्यानंतर आश्विन शुद्ध द्वादशीपर्यंत दूध आणि दूधाचे पदार्थ वर्ज्य करावेत.

नंतर कार्तिक शुद्ध द्वादशीपर्यंत तूर अथवा तुरीच्या डाळीचे पदार्थ आणि मूग इत्यादी द्विदल धान्ये वर्ज्य करावीत.

याकाळात पायाला तेल लावू नये.
by (11.3k points)

Related questions

...