1.1k views
in Hindu - Puja Vidhi by (11.3k points)
edited by

1 Answer

0 votes
नैमित्तिक पूजा म्हणजे वर्षात सणावाराच्या दिवशी अथवा विशिष्ट दिवशी करावयाच्या पूजा, यासाठी ब्राह्मण पाहिजे याची आवश्यकता नाही. या सर्व पूजा व्रत

या  प्रकारात मोडतात. या पूजनामुळे परिवाराचे कल्याण साधले जाते. या पूजेत प्रत्येक व्रताचे पूजन आणि मंत्र वेगवेगळे आहेत. या सर्व पूजांना पोथ्यांचा,

पुराणाचा आधार आहे. यात षोडशोपचार आणि पंचोपचार पूजा करतात.

या पूजेत संकल्प करवा लागतो. कोणतीही पूजा करतांना प्रारंभी गणेशपूजन आवश्यकच आहे.

या पूजा खालील प्रमाणे होत.

१) गुढीपाडवा - चैत्र शुक्ल प्रतिपदा

२) श्रीराम नवमी - चैत्र शु्क्ल नवमी

३) हनुमान जयंती - चैत्र पौर्णिमा

४) अक्षय्य तृतीया - वैशाख शुक्ल तृतीया

५) नृसिंह जयंती - वैशाख शुक्ल चतुर्दशी

६) वटसावित्री - वैशाख पौर्णिमा

७) एकादशी - आषाढ आणि कार्तिक शुक्ल एकादशी

८) व्यासपूजा किंवा गुरूपूजा - आषाढ पौर्णिमा यास व्यास पौर्णिमाही म्हणतात.

९) नागपंचमी - श्रावण शुक्ल पंचमी

१०) श्रीकृष्ण जन्माष्टमी - श्रावण कृष्ण अष्टमी

११) हरितालिका - भाद्रपद शुक्ल तृतीया किंवा गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी

१२) गणेशचतुर्थी - भाद्रपद शुक्ल चतुर्थी, हे व्रत दहा दिवस असते.

१३) ऋषीपंचमी - भाद्रपद शुक्ल पंचमी किंवा गणेशचतुर्थीच्या दुसर्‍या दिवशी.

१४) वामन द्वादशी - भाद्रपद शुक्ल द्वादशी.

१५) अनंतचतुर्दशी - भाद्रपद शुक्ल चतुर्दशी.

१६) पितृपूजा अथवा पितृपंधरवडा - भाद्रपद पौर्णिमेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंत.

१७) शारदीय नवरात्र - अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शुक्ल नवमी पर्यंत.

१८) सरस्वती पूजा - अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी.

२०) शमी पूजा - अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी.

२१) कोजागिरी पौर्णिमा - अश्विन पौर्णिमा.

२२) गुरूद्वादशी - अश्विन कृष्ण द्वादशी.

२३) श्रीलक्ष्मी ( धन )पूजा - अश्विन कृष्ण त्रयोदशी, धनतेरस

२४) श्रीलक्ष्मीपूजन - अश्विन अमावस्या.

२५) तुलसीविवाह - कार्तिक शुक्ल द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत.

२६) श्रीदत्त जयंती ( दत्त पूजा ) - मार्गशीर्ष पौर्णिमा.

२७) संक्रांतीपूजा - सूर्य कर्क राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस.

२७) होलिकोत्सव - फाल्गुन पौर्णिमा
by (11.3k points)

Related questions

...