1.1k views
in Hindu - Traditions by (11.3k points)

1 Answer

0 votes
विवाह जमवतांना नक्षत्रयोग अतिशय महत्वाचा असतो. आणि त्या नक्षत्रावरून बेतेलेले कोष्टक पाहून किती गुण जमतात ते पाहून लग्न ठरवावे लागते.

याला ' गुणमेलन ' म्हणतात.

गुणमेलन वर्ण, वश्य, तारा, ग्रहमैत्री, गण, भकूट किंवा कूट आणि नाडी या आठ गोष्टींवरून केले जाते. यात कमीतकमी १८ गुण जमावे लागतात, आणि

जास्तीतजास्त ३६ गुण जमतात. असे म्हणतात की ३६ गुण जमल्यास नंतर संसारात ३६ आंकडा होऊन कलह होतात. यात क्रमवार

१+२+३+४+५+६+७+८=३६ गुण होतात. म्हणजे वर्णला १ गुण तर नाडीला ८ गुण, म्हणजे नाडी गुण फार महत्वाचे.

नुसते गुणच पाहून लग्न न ठरवितां लग्नेश, पंचमेश, सप्तमेश, अष्टमेश आणि व्यवेश पाहून मगच लग्न ठरवावे. हे पांचही अधिपती एकमेकांना अनुकूल

असावेत. वधूवराचे नक्षत्र व चरण अति महत्वाचे.
by (11.3k points)

Related questions

...