372 views
in Hindu - Philosophy by (11.3k points)

1 Answer

0 votes
 
Best answer
सत्व, रज, तम या तिन्ही गुणांचा क्षोभ करुन जगत निर्माण करणारी ईश्वरी माया. हिला गुणमाया असेही म्हणतात.

गुरु -
आचार्य, उपाध्याय, ज्येष्ठ, श्रेष्ठ, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू, उपदेशक इ. गुरु शब्दाचे अनेक अर्थ आहेत. शिष्याने गुरुगृही राहून अध्ययन करणे, यास गुरुकुल पद्धत म्हणतात. दीक्षागुरु व शिक्षागुरु असे गुरुचे दोन भेद आहेत. पूर्व परंपरेने प्राप्त झालेल्या मंत्राची दीक्षा देणारे ते दीक्षागुरु आणि ध्यान धारणा इ. साधनेचे विविध प्रकार शिकविणारे ते शिक्षागुरु. गुरुंमध्ये पुढील प्रकार पडू शकतात.
१ प्रेरक -
साधकाच्या मनात दीक्षेची प्रेरणा देणारे
२  सूचक -
साधना व दीक्षा यांचे प्रकार वर्णन करणारे
३ वाचक -
साधकाच्या योग्यतेला ओळखणारे
४  दर्शक -
साधना आणि दीक्षा यातील योग्यायोग्यता सांगणारे
५  बोधक -
साधना आणि दीक्षा यांचे तात्त्विक विवेचन करणारे
६  शिक्षक -
साधना शिकविणारे
७  सिद्ध -
शक्तिपाताद्वारे ब्रह्मज्ञान देणारे. या सर्वात ब्रह्मज्ञान देणारे सिद्ध गुरु सर्वश्रेष्ठ होत. (पाहा - शक्तिपात)

गुरु शब्दातील तीन वर्णाचा अर्थ पुढीलप्रमाणे -
गकार हा सिद्धी देणारा, रकार हा पापहारक व उकार हा विष्णुपदाचा होय. गुरु हे ब्रह्मा, विष्णू व महेश्वर असून साक्षात परब्रह्म होत. त्यांना नमस्कार असो. या अर्थाचा श्लोक सर्वांना सुपरिचित आहे. गुरु कसा असावा, याबद्दल तंत्रसार ग्रंथात म्हटले आहे.

शान्तो दान्त: कुलीनश्च विनीत: शुद्धवेषवान्‍ ।
शुद्धाचार: सुप्रतिष्ठ: शुचिर्दक्ष: सुबुद्धिमान ॥
अध्यात्मध्याननिष्ठश्च मन्त्रतन्त्रविशारद: ।
निग्रहानुग्रहे शक्तो गुरुरित्यभिधीयते ॥
by (11.3k points)
selected by
...