716 views
मुक्ती ही प्राणीमात्राची अंतीम अवस्था आहे.
in Hindu - Beliefs by (11.3k points)

1 Answer

0 votes
सर्व प्रकारच्या दु:खापासून,बंधनापासून, वासनांपासून आणि अज्ञानापासून सुटण्याची, मोकळे होण्याची जी अवस्था ती मुक्ती होय. अज्ञानबंधामुळे जीव आपले मूळ परमात्मस्वरुप विसरुन स्वत:स देहबद्ध समजतो. आध्यात्मिक साधनेमुळे हा बंध दूर होऊन जीव स्वस्वरुपास - आत्मस्वरुपास प्राप्त होतो, त्यालाच मुक्ती मिळणे असे म्हणतात. देह पडेपर्यंत आत्मज्ञानाला जीवनमुक्ती मिळते. आणि देह पडल्यावर विदेहमुक्ती मिळते. मुक्तीच्या चार पायर्‍या आहेत -

१ - सलोकता मुक्ती -
परमेश्वराच्या लोकी म्हणजे प्रदेशी पोचणे, अर्थात त्याचे संपूर्ण स्वरुप आकलन होणे.

२ - समीपता मुक्ती -
परमेश्वरी स्वरुपाचे ज्ञान तर मिळतेच शिवाय एकनिष्ठ भक्तीच्या साहाय्याने त्याच्या जवळ जाता येते.

३ - सरुपता मुक्ती -
परमेश्वराचे साक्षात दर्शन होते. जगाच्या कणाकणात ईश्वराचे रुप दिसते.

४ - सायुज्यता मुक्ती -
देव व भक्त हे द्वैत विरुन भक्त देवात एकरुप होतो.
by (11.3k points)
...