383 views
in Hindu - Beliefs by (11.3k points)

1 Answer

0 votes
परमेश्वर आपल्या भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी अर्चा, विभव, व्यूह, सूक्ष्म व अंतर्यामी अशी पाच प्रकारची रुपे धारण करतो.
१ - मृत्तिका, धातू किंवा अन्य वस्तूंपासून निर्माण झालेली आणि सुप्रतिष्ठित झालेली मूर्ती म्हणजे अर्चारूप.
२ - राम, कृष्ण इ. अवतारात ईश्वराची जी अभिव्यक्ती होते ती विभव.
३ - ईश्वराच्या अलौकिक गुणांची प्रधानता म्हणजे व्यूह. (पाहा - चतुर्व्यूह)
४ - सूक्ष्म - ज्ञान, शक्ती ऐश्वर्य, बल, वीर्य, तेज या षड्‍गुणांनी युक्त असलेला वासुदेव परब्रह्म म्हणजे सूक्ष्म.
५ - आत्म्याच्या आत राहून जीवांचे नियमन करणारा तो अंतर्यामी. (विशिष्टाद्वैत मत)
by (11.3k points)
...