254 views
in Hindu - Philosophy by (11.3k points)

1 Answer

0 votes
ज्यात वैदिक मंत्रांचा अर्थ सूक्ष्मतर भेदांसह लावलेला असतो असे शास्त्र. वैदिक मंत्रांचे अर्थ करण्याच्यावेळी ऋषी, छंद, देवता व पदपाठावर लक्ष ठेवावे लागते. त्याचप्रमाणे प्रत्येक वैदिक मंत्राचे अधिभूत, अध्यात्म व अधिदैवत या भेदाने तीन तीन अर्थ होतात, या नियमाकडेही लक्ष ठेवावे लागते. अधिभूत अर्थामध्ये मंत्रातील पद व आधिभौतिक स्थूल पदार्थांचे प्रतिपादन असते. अध्यात्म अर्थामध्ये शरीरातील इंद्रिये, मन, बुद्धी, आत्मा इ. चे प्रतिपादन असते. अधिदैवत अर्थामध्ये ब्रह्मांडातील सूक्ष्मातिसूक्ष्म शक्तींचे प्रतिपादन येते. या तीन अर्थांना स्थूल, सूक्ष्म व पर अशी नावे आहेत. या सर्व अर्थांचे पृथक्‍ पृथक्‍ लक्षण आगमशास्त्रात सांगितले आहे. स्थूल अर्थ व्युत्पत्तीने व्यक्त होतो. सूक्ष्म अर्थ लक्षणेने प्रकट होतो. तर पर अर्थ पारमार्थिक रहस्ये उलगडतो.
by (11.3k points)
...