371 views
चांगल्या प्रकारे केलेला संवाद म्हणजे वाद. वाद म्हणजे भांडण नव्हे. त्याला तार्किक आधार असतो.
in Hindu - Philosophy by (11.3k points)

1 Answer

0 votes
तत्वाचे स्वरुप निश्चित करण्याची एक विद्या. तर्काने आपले विचार नीट मांडणे. विषय समजावून देण्याची रीत. यास मत असेही म्हणतात. तत्व जाणण्याची इच्छा करणार्‍या व्यक्तीबरोबर संवाद म्हणजे वाद होय. अनुकूल व प्रतिकूल प्रश्न उपस्थित करुन कोणत्याही विषयाची चर्चा केल्याशिवाय त्यातील सत्याचा शोध करणे शक्य होत नाही. एखाद्या सिद्धाताचे सत्य किंवा महत्व चांगल्या प्रकारे समजण्यासाठी त्याची उलट बाजूही समजावी लागते. त्रिकालाबाधित म्हणून जी सत्ये प्रसिद्ध असतात, त्यांच्याबद्दलही वाद उपस्थित केल्याशिवाय त्या मिसळलेली भ्रामक विधाने दूर करता येत नाहीत. म्हणून प्राचीन भारतीयांनी ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’ - म्हणजे वाद केल्याने तत्त्वाचा उलगडा होत जातो, असे म्हटले आहे. आध्यात्मिक क्षेत्रात अनेक तात्विकवाद आहेत. प्रत्येक वादात सृष्टिउत्पत्ती, जीवनाचे अंतिम ध्येय, जीव, जगत, जगदिश्वर यांचा संबंध इ. बद्दल चिंतन करुन आपापली विचारप्रणाली मांडली आहे.

तत्वज्ञानातील विविध वादांचे स्पष्टीकरण - यात पौर्वात्य तसेच पाश्चिमात्य या दोन्ही तत्त्वज्ञानातील वाद आले आहेत.

१ - अचिंत्यभेदाभेद
२ - अजातवाद
३ - अणुवाद (परमाणुवाद)
४ - अंत:प्रज्ञावाद
५ - अतीततत्त्ववाद
६ - अतिमानसवाद
७ - अद्वैतवाद
८ - अध्यासवा
९ - अनध्यस्तविवर्तवाद
१० - अनात्मवाद
११ - अनीश्वरवाद
१२ - अनुभवप्रामाण्यवाद
१३ - अनुभवसत्तावाद
१४ - अनुमानयुक्तिवाद
१५ - अनेकतत्त्ववाद
१६ - अनेकान्तवाद
१७ - अनेकेश्वरवाद
१८ - अन्विताभिधानवाद
१९ - अपोहवाद
२० - अपौरुषेयवाद
२१ - अर्थवाद
२२ - अविश्ववाद
२३ - अस्तित्ववाद
२४ - अज्ञेयवाद
२५ - आत्मवाद
२६ - आभासवाद, प्रतिबिंबवाद व अवच्छेदवा
२७ - आरंभवाद
२८ - आशानिराशावाद
२९ - ईश्वरवाद
३० - उच्छेदवाद
३१ - उत्क्रान्तिवाद
३२ - उपयोगितावाद
३३ - एकजीववाद, अनेकजीववाद
३४ - एकत्ववाद
३५ - एकेश्वरवाद
३६ - केवलवाद
३७ - क्रियाविधिवाद
३८ - ख्यातिवाद
३९ - गूढवाद
४० - चिद्वाद
४१ - चिद्विलासवाद
४२ - जडवाद
४३ - थेरवाद
४४ - तार्किक परमाणुवाद
४५ - तार्किक अनुभववाद
४६ - तार्किक वास्तववाद
४७ - थोमिवाद
४८ - दु:खवाद
४९ - दृष्टीसृष्टीवाद
५० - द्वैतवाद
५१ - द्वैताद्वैतवाद
५२ - धर्मनिरपेक्षतावाद
५३ - नयवाद
५४ - निरीश्वरवाद
५५ - निसर्गवाद
५६ - नीतिशास्त्रीयवाद
५७ - नीतिशास्त्रीय आकारवाद
५८ - नीतिशास्त्रीय बुद्धिवाद
५९ - नीतिशास्त्रीय साध्यवाद
६० - नैष्कर्म्यवाद
६१ - परत:प्रामाण्यवाद व स्वत:प्रामाण्यवाद
६२ - परात्मवाद
६३ - परिणामवाद
६४ - प्रतिबिंबवाद
६५ - प्रयोजनवाद
६६ - प्रत्यक्षादर्शवाद
६७ - प्रत्यक्षान्तवाद
६८ - प्रवृत्ती, निवृत्तिवाद
६९ - प्राणवाद
७० - प्रारब्धवाद
७१ - बुद्धिवाद
७२ - बिंबप्रतिबिंबवाद
७३ - ब्रह्मवाद
७४ - भववाद
७५ - भेदाभेदवाद
७६ - मानववाद
७७ - मायावाद
७८ - यतित्ववाद
७९ - यंत्रवाद
८० - लीलावाद
८१ - वास्तववाद
८२ - विकासवाद
८३ - विवर्तवाद
८४ - विशिष्टाद्वैतवाद  
८५ - विषयीवाद
८६ - विज्ञानवाद
८७ - व्यक्तिवाद
८८ - व्यवहारवाद
८९ - शब्दाद्वैतवाद
९० - शाश्वतवाद
९१ - शुद्धाद्वैतवाद
९२ - शून्यवाद
९३ - सत्कार्यवाद
९४ - सहकार्यवाद
९५ - समिक्षावाद
९६ - सर्वेश्वरवाद
९७ - सर्वमानसवाद
९८ - संशयवाद
९९ - सुखवाद
१०० - सूफीवाद
१०१ - स्फूर्तिवाद
१०२ - स्फोटवाद
१०३ - स्यादवाद
१०४ - स्वभाववाद
१०५ - स्कोलँस्टिकवाद
१०६ - नवस्कोलँस्टिकवाद
१०७ - स्वार्थ - परार्थवाद
१०८ - क्षणिकवाद, क्षणभंगवाद - प्रवर्तक -
बौद्धदर्शन. प्रत्येक वस्तूचे अस्तित्व हे क्षणभरापेक्षा जास्त नसते. एका वस्तूमध्ये एकावेळी एकच कार्य होऊ शकते. दुसर्‍या क्षणी दुसरे कार्य. एक बीज एका क्षणात एकच क्रिया उत्पन्न करते. एका क्षणात ते अंकुराला जन्म देते. तर दुसर्‍या क्षणात तो अंकुर वाढविते. दुसरा क्षण आला की पहिला क्षण समाप्त होतो. प्रत्येक वस्तू आपल्या जन्माबरोबर मृत्यूशीही निबद्ध राहते. कोणतीही वस्तू कोणत्याही दोन क्षणात समान रुपात असत नाही.

संदर्भ - पारमार्थिक शब्दकोश
by (11.3k points)
...