समापत्ती -
कोणत्याही ठिकाणी होणारी चित्ताची जी तन्मयता तिला समापत्ती म्हणतात. बाह्य विषयाशी चित्त समापन्न (एकाग्र) जाले म्हणजे ती ग्राह्य समापत्ती, इंद्रिये व तन्मात्रा (विषय) इ. शी चित्त समापत्र झाले म्हणजे ती ग्रहण समापत्ती आणि आत्माकार चित्त झाले म्हणजे ती ग्रहीतृ समापत्ती कोणत्याही मंत्राच्या साहाय्याने देवतेच्या स्वरुपाचा आकार चित्तास प्राप्त झाला असता ती सवितर्क समापत्ती. सवितर्क समापत्तीची पक्वावस्था म्हणजे निर्वितर्क समापत्ती. यात अगदी सहजपणे वृत्ती मंत्राच्या अर्थाकार होते. तिला अर्थमात्रनिर्भासा समापत्ती म्हणतात. यावेळी जो शुद्ध, निर्विचार अशी चित्ताची अवस्था प्राप्त होते, त्यास वैशारद्य असे म्हणतात. वैशारद्य म्हणजे समाधीची पक्वावस्था होय. (पातंजल योगशास्त्र).