643 views
in Hindu - Philosophy by (11.3k points)

1 Answer

+1 vote
स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण देह -

१ पहिला स्थूल देह स्थूल पंचमहाभूतांपासून झालेला असतो. तो ज्ञानेंद्रियांना गोचर होत असतो. स्थूल देह रस, रक्त, मांस, मज्जा, अस्थी व रेत या धातूंनी बनलेला असतो. स्थूल देहाला कर्मदेह किंवा भोगदेह असेही म्हणतात. या देहावर अभिमान ठेवणार्‍या समष्टीरुप आत्म्याला वैश्वानर म्हणतात.

२ दूसरा सूक्ष्म देह सूक्ष्म पंचमहाभूतांपासून झालेला असून तो माणसाच्या मनात ज्या अनंत वासना असतात, त्या वासनांचे मिळून बनलेला असतो. कर्मेंद्रियाद्वारा मनुष्य जे जे व्यापार करतो व ज्ञानेंद्रियाद्वारा जे जे विषय ग्रहण करीत असतो, त्यांचे संस्कार त्याच्या चित्तात उमटत असतात व त्या संस्कारांच्या अनुकूल, प्रतिकूलतेप्रमाणे माणसाच्या वासना बनतात. या वासनांचा समुच्चय, कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये व अंत:करण ही सर्व मिळून सूक्ष्म देह होतो, यास लिंगदेह असेही म्हणतात. लिंगदेहावर अभिमान ठेवणार्‍या जीवात्म्यास तैजस म्हणतात. सर्व सूक्ष्म देहांवर अभिमान ठेवणार्‍या आत्म्यास हिरण्यगर्भ म्हणतात.

३ स्थूल व सूक्ष्म या दोन्ही शरीरांना कारण असलेला तिसरा देह म्हणजे ब्रह्मस्वरुपाबद्दलची अविद्या होय. या देहावर अभिमान ठेवणार्‍या जीवाला प्राज्ञ म्हणतात. सर्व कारण देहांवर अभिमान ठेवणार्‍या आत्म्याला ईश्वर असे म्हणतात.

४ चौथा महाकारण देह हा आत्मज्ञानाचा होय. त्यावर अभिमान ठेवणारा व्यष्टीरुप प्रत्यगात्मा होय आणि समष्टीरुप परमात्मा होय.
by (11.3k points)
...