290 views
असे समजते की, काश्मिरमधील शैवदर्शनाच्या शाखेला स्पंदशास्त्र म्हणतात.
in Hindu - Philosophy by (11.3k points)

1 Answer

0 votes
स्पंदशास्त्र -
काश्मिरीय शैवदर्शनाच्या एका शाखेला स्पंदशास्त्र म्हणतात. या दर्शनाचे प्रवर्तक वसुगुप्त यांनी शिवसूत्रे या ग्रंथाची रचना केली. यात शिवसूत्रांच्या सिद्धान्ताचे शक्तीच्या दृष्टीकोनातून स्पंदशास्त्रात विवेचन आले आहे. या शास्त्रात एक परमेश्वर हा परम सत्य मानलेला आहे. हे शास्त्र अद्वैतवादी आहे. त्याच्या मते जीव परमेश्वराशी अभिन्न आहे. पण मलाच्या आवरनाने या तादात्म्याचा बोध होत नाही. आणव, मायीय व कार्मण असे मलाचे तीन प्रकार आहेत. जेव्हा आत्मा अज्ञानामुळे आपले शुद्ध, स्वतंत्र व व्यापक स्वरुप विसरुन स्वत:ला अपूर्ण मानतो व देहालाच सर्वस्व मानतो तेव्हा या सीमिततेला कारण होणार्‍या मलाला आणव मल म्हणतात. जीव देहरुप घेऊन संसारात भ्रमण करतो, त्याचे कारण मायीय मल असतो. अंत:करण प्रेरणेने जेव्हा इंद्रिये कार्यप्रवण होतात, त्यामागे कार्मन मल असतो. नादामुळे या तीन मलांची क्रिया प्रवातत होते. नाद हा मलाचे मूळ आहे. अखंड ध्यान व दृढ योग यांच्यामुळे योग्याच्या मनात परमेश्वराचे रुप साकारते. त्यामुळे परमेश्वरापासून आपण विभक्त आहोत, हा भाव दूर होतो. सर्व मलांचा नाश होतो. ही अवस्था पक्व झाली की जीवात्मा परमात्मरुप होतो. परमेश्वराच्या या साक्षात्काराला भैरव म्हणतात. या स्पंदशास्त्राचा प्रमुख ग्रंथ वसुगुप्ताचा ग्रंथ वसुगुप्ताचा स्पंदकारिका हा आहे.
by (11.3k points)
...