356 views
in Hindu - Philosophy by (11.3k points)

1 Answer

0 votes

चित्त -
चिंतन करणारी वृत्ती म्हणजे चित्त. हे अंत:करणचतुष्टयापैकी एक होय. चित्ताची बहिर्मुखता व अंतर्मुखता यास अनुसरुन चित्ताच्या पाच भूमिका होतात.

१  मूढ -
चित्तात तमोगुणाचे आधिक्य असले की ते आळस, निद्रा इ. नी ग्रस्त होते. आणि जीवाकडून मोहमूलक पापाचरणही करवते. यास मूढ चित्त म्हणतात. यास स्थितिशील चित्त असेही म्हणतात.

२  क्षिप्त -
चित्ताच रजोगुणाचे आधिक्य असले की ते सर्वदा बाह्य विषयांकडे खेचलेले असते. एखादा मनोविकार बळावून वृत्ती सैरावैरा धावू लागतात, यास क्षिप्त चित्त म्हणतात. यास प्रवृत्तिशील चित्त असेही म्हणतात.

३ विक्षिप्त -
सर्व सामान्य माणूस आपले नित्याचे व्यवहार करताना त्याच्या चित्ताची जी अवस्था असते तिला विक्षिप्त चित्त म्हणतात. यावेळी चित्ताची बहिर्मुखता आणि अंत:र्मुखता दोन्ही असतात.

४  एकाग्र -
चित्तवृत्ती ज्यावेळी एकाच ज्ञानविषयावर केंद्रीत होतात त्यावेळी ते एकाग्र चित्त म्हटले जाते. यास प्रख्याशील चित्त असेही म्हणतात. प्रख्या म्हणजे ज्ञानप्रकाश.

५  निरुद्ध -
चित्ताच्या सर्व वृत्तींचा (वृत्ती म्हणजे चित्त विषयांकडे धावणे) निरोध झाला म्हणजे ते निरुद्ध चित्त होय. एकाग्र व निरुद्ध चित्त योगसाधनेस अत्यंत अनुकूल ठरते. असे चित्त अत्यंत स्थूल किंवा सूक्ष्म अशा कुठल्याही आलंबनावर (ध्येय वस्तूवर) स्थिर होऊ शकते, किंवा आलंबनाशिवायही स्थिर होते, अशा चित्तास वशीकार चित्त असेही म्हणतात.

आणि मन म्हणजे ज्याला जगातील सुखदुःखाचे ज्ञान होते. मन हे मोक्षाला कारणीभूत असते.
दोन्हीही काल्पनिक आहेत.

 

by (11.3k points)
...