442 views
पिंड म्हणजे प्राण्याचा देह. मानवाच्या देहाशी पिंड आणि ब्रह्मांड दोन्ही बाबी लागू होतात.

शिवाय पिंडी आणि ब्रह्मांडी हे काय आहे.
in Hindu - Philosophy by (11.3k points)
edited by

1 Answer

+1 vote

पिंड - ब्रह्मांड -


पिंड म्हणजे व्यष्टी (व्यक्ती) देह आणि ब्रह्मांड म्हणजे समष्टी (समाज) देह. प्रत्येक प्राण्याचा देह म्हणजे पिंड व चतुर्दशभुवनात्मक ईश्वराचे विराट शरीर म्हणजे ब्रह्मांड होय. व्यष्टींचा समूह म्हणजे समष्टी आणि समष्टीचे पृथ:करण म्हणजे व्यष्टी. ब्रह्मांडातूनच पिंडाची उत्पत्ती होत असल्याने या दोघात कार्यकारणभाव आहे, एकात्मकता आहे. म्हणून ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ असे म्हणतात. पिंडात बुद्धी तसा ब्रह्मांडात ब्रह्मदेव, पिंडात चित्त तसा ब्रह्मांडात नारायण, पिंडात अहंकार तसा ब्रह्मांडात रुद्र होय. आपल्या शरीरात मूलाधारापासून सहस्त्रारापर्यंत जी सात चक्रे आहेत, त्यांच्या ठिकाणी क्रमाने भू:, भूव:, स्व: इ. सप्तलोकांची कल्पना करण्यास सांगितले आहे. कमर, मांडया, गुडघे इ. अवयवांच्या ठिकाणी अतल, वितलादी सप्त पातालांची कल्पना करावी. रसरक्तादी सप्त धातूंची क्रमाने जंबू, प्लक्ष इ. द्विपांच्या ठिकाणी कल्पना करावी. इडा, पिंगला, सुषुम्ना या नाडयांना गंगा, यमुना, सरस्वती समजावे. अन्य नाडयांच्या ठिकाणी गोदा, नर्मदा इ. नद्यांची व स्वेद, बाष्प इ. शरीरातील जलीय द्रव्यांच्या ठिकाणी सप्त समुद्र कल्पावेत. अशाप्रकारे पिंडाचे ब्रह्मांडाशी पूर्ण ऐक्य कल्पून या दोहोंना व्यापून राहिलेला परमेश्वर या दोहोंहून निराळा नाही, तसे पिंडब्रह्मांडही परमेश्वरापासून वेगळे नाहीत, अशी एकरुपतेची भावना करावी. यौगिक परिभाषेतक, मूलाधारापासून आज्ञाचक्रापर्यंतच्या भागाला पिंड व आज्ञाचक्रापासून ब्रह्मरंध्रापर्यंतच्या भागाला ब्रह्मांड म्हणतात.

 

by (11.3k points)
...